डॉ. प्रविण मुंढे रत्नागिरीचे नवे पोलिस अधिक्षक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य गृह विभागाने अलिकडेच मोठया प्रमाणावर राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल केले होते. त्यानंतर देखील 13 पोलिस उपायुक्‍त /अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, आज (बुधवार) राज्य गृह विभागाने आणखी 4 पोलिस उपायुक्‍त / अधिक्षकांच्या बदल्या केल्या असून डॉ. प्रविण मुंढे यांची नियुक्‍ती रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक म्हणून करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B077Q19RF9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’483e29a5-9b12-11e8-97cc-2364bef69da5′]

नियुक्‍ती करण्यात आलेल्या पोलिस उपायुक्‍त /अधिक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे नियुक्‍ती करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे.

डॉ. प्रविण मुंढे (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते पोलिस अधिक्षक, रत्नागिरी), प्रणय अशोक (पोलिस अधिक्षक, रत्नागिरी ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 04, नागपूर), नितीन पवार (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 13, वडसा-देसाईगंज – बदली आदेशाधीन ते पोलिस अधिक्षक, अनुसचित जाती / जमाती आयोग, मुंबई) आणि शेषराव सुर्यवंशी (पोलिस उपायुक्‍त पुणे शहर ते पोलिस अधिक्षक, लोहमार्ग, पुणे). पुणे पोलिस आयुक्‍तालयात कार्यरत असणार डॉ. प्रविण मुंढे आणि शेषराव सुर्यवंशी यांची अनुक्रमे रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक आणि लोहमार्ग,पुणे चे पोलिस अधिक्षक अशी बदली झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी राज्य गृह विभागाने 95 हून अधिक पोलिस उपायुक्‍त / अधिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर 13 पोलिस उपायुक्‍त / अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आणि आता चार पोलिस उपायुक्‍त / अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ. प्रविण मुुंढे हे पुणे पोलिस आयुक्‍तालयात झोन-2 म्हणून कार्यरत होते तर शेषराव सुर्यवंशी हे पुणे पोलिस आयुक्‍तालयात मुख्यालय-2 येथे कार्यरत होते.


संबधित बातमी
राज्यातील १३ पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या