मुख्य परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे यांच्या हस्ते जमदाडे यांना आभारपत्र प्रदान

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आध्यासन केंद्राला युवक फाउंडेशन या संस्थेने कुलगुरू डॉ.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत २०० ग्रंथ भेट दिली होती. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आध्यासन केंद्र स्वा.रा.ती.म. विद्यापीठ यांच्या तर्फे मा. नगरसेवीका डॉ.करुणा जमदाडे यांच्या मार्गदर्शन खाली चालणाऱ्या या संस्थेला मुख्य परीक्षा नियंत्रक डॉ.रवी सरोदे सर, यांच्या हस्ते आभार पत्र प्रदान करण्यात आले.

सातशे वर्षांपुर्वी वारकरी सांप्रदायाने सामाजिक ऐक्याची परंपरा निर्माण केली : बाबा महाराज सातारकर

जाहिरात

यावेळी स्वा.रा.ती.म. विद्यापीठातील कर्मचारी काळबा हानवंते, यांची उपस्थिती होती. या चागल्या उपक्रमाबद्दल चर्चा रंगली आहे.
सिडको, नवीन नांदेड येथील रहिवाशी तथा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका डॉ. करुणाताई भीमराव जमदाडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रास ग्रंथ स्वरूपात भेट दिली आहे. त्याबद्दल त्यांना आभार पत्र देण्यात आले. सदर आभार पत्र मा. डॉ. रवी नि. सरोदे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांचे हस्ते स्वीकारतांना ताईंचे सुपुत्र प्रतीक (गोल्डी) जमदाडे.

यावेळी विद्यापीठाचे काळंबा हनवते,  प्रतीक (गोल्डी) जमदाडे (अध्यक्ष, युवक फाउंडेशन सिडको,नांदेड) हर्षल जाधव, शंतनू सरोदे, प्रवीण जोंधळे, अजय अन्नमवाड, अक्षय जोगदंड व इतर काही जणांची उपस्थिती होती.

जाहिरात