महत्वाच्या बातम्या

बालपणीच स्वप्न अखेर भोसरीत पूर्ण : अमृता फडणवीस

भोसरी : पोलीसनामा ऑनलाईन- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व आयकौनिक मदर सिंधूताई सपकाळ यांनी भोसरीत सुरू असलेल्या इंद्रायणी थडीला आज भेट दिली. यावेळी अमृता फडणवीस यांचे पारंपरीक पध्दतीने शानदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान त्यांना स्वागत कमानपासून व्यासपीठा पर्यंत बैलगाडीवर स्वार करुण ढोलताश्याच्या गजरामध्ये पोहचवण्यात आले.

माझी लहानपणा पासूनची इच्छा होती की “मी बैलगाडीची सफर करावी” ती इच्छा आज मला महेश दादांनी घडवून आणली. याबद्द्ल अमृताजींनी महेश लांडगेंचे आभार मानले. तर बैलगाडीची सफर ही शेतात करायची इच्छा होती, मात्र ती इच्छा पुढील वेळेस महेशदादा पूर्ण करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. उद्योगनगरीत लोकपावत असलेल्या परंपरा जपणे. त्यासाठी इंद्रायणी थडीसारखी भव्य जत्रा घडवून आणंन हे अतिशय दमदार काम असल्याचंही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

कार्यक्रमात किरकी येथील सैन्य रिहाबिलेशन सेंटर मधील जवानांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनेक पुरस्कार, कार्यक्रम होतच असतात, मात्र आज पहिल्यांदाच मला इथे आपल्या देशासाठी लढत असतांना आपले शरीरातील हात, पाय गमावलेल्या शुर जवानांचा संन्मान केला. त्यामुळे महेश लांडगे यांची कवितातून स्तुति सिंधुताईनी यावेळी केली. तसेच अमृता फडणवीस यांनी देखील महेश लांडगेंन सैन्य दलातील सैनिकांचा सन्मान केल्या बद्द्ल आभार मानले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या