प्रसूतीदरम्‍यान बाळाचा मृत्‍यू, पत्नी गंभीर, पतीची रुग्णालयात आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे निराश झालेल्या वडीलांनी रुग्णालयात आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार आज (सोमवार) सायंकाळी सातच्या समुरास जिल्हा रुग्णलय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडला. देवला बारका बारेला असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

देवला बारेला याने रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या वृक्षाला रुमालाच्या सहाय्याने गळफाश घेत आपले जिवन संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.चोपडा तालुक्यातील रामजीपाडा येथे देवलाची पत्नी उबर्‍याबाई,  मुलगा सोनगीश, मुलगी शारदाबाई, राहबाबाई यांच्यासह आई, वडिलांसह वास्तव्यास आहे. दुसर्‍याच्या शेतात काम करुन उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब. प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्‍यू झाल्याने चोपडा येथील ग्रामीण रुग्णालयातून देवला यांची पत्नी उबर्‍याबाई हिला दोन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

बाळाला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शस्‍त्रक्रिया केली. शर्थीचे प्रयत्न करुनही बाळाचा मृत्यू झाला. यानंतर उबर्‍याबाई हिचा रक्तश्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे,. तिला दररोज रक्त देण्यात येत आहे. तिच्याजवळ रुग्णालयता आई ढेमाबाई उनकार बारेला व पती देवला बारेला हे थांबले होते.

रविवारी रात्री देवला जेवण करण्यासाठी उबर्‍याबाईकडे आले. याठिकाणी दोघांनी जेवण केले. यानंतर देवला सासू ढेमाबाई यांना सांगून झोपण्यासाठी प्रसूती कक्षातून जिल्हा रुग्णालय आवारात आला. त्यानंतर सकाळी त्याच्या आत्महत्येची बातमी मिळाल्याने ढेमाबाई यांनी सांगितले.

रुग्णालयातील इतर नातेवाईकांना वार्ड क्रमांक ९ च्या मागील बाजूस असलेल्या आवारात फिरत असताना वृक्षाला गळफास घेतलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी डॉक्टरांना कळविले. डॉक्टरांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यावरुन पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, करुणासागर जाधव, जितेंद्र सुरवाडे, भगवान महाजन, दिलीप पाटील, नंदकिशोर पाटील यांनी रुग्णालयातील कर्मचारी रामचंद्र पाटील यांच्यासह इतरांच्या मदतीने मृतदेह खाली उरविला. याबाबत जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.