बायोपिक मधून येणार लाडका ‘लक्ष्या’ प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड प्रमाणे अता मराठी सिनेसृष्टी मध्ये देखील अनेक नव नवीन प्रयोग होत असल्याचे दिसून येते. चित्रपट असो किंवा नाटक अश्या सर्वच ठिकाणी आता मराठी कलाकारांचे सुध्या वर्चस्व वाढवू लागले आहेत. सध्याच्या नवीन ट्रेंड प्रमाणे मराठीमध्ये देखील बायोपिक साकारण्यात येणार आहे. हि बायोपिक दुसरी तिसरी कोणाची नसून मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ ह्याच्यावर आधारित ‘लक्षातला लक्ष्या’ हे या बायोपिक चे नाव आहे.

आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण जीवन पट (बायोपिक) पहिल्यांदाच नाटकाच्या  स्वरूपातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्याच्या नवीन कलाकारांना लक्ष्याच्या ह्या जीवन प्रवासामधून बरेच काही शिकण्यासारखे तसेच प्रेरणादायी ठरेल म्हणून हि बायोपिक तयार करण्यात येणार आहे. ह्या संपूर्ण नाटकाची जबादारी तसेच निर्मिती आणि लिखाण हे ‘ पुरूषोत्तम बेर्डे ‘ करणार आहे. तर  नाटकाचं दिग्दर्शन ‘विजय केंकरे’ करणार आहेत. आणि ह्या नाटकातून लक्ष्या पुन्हा एकदा आपला लाडका लक्ष्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दिसून येते.

नाटकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा उत्तम पद्धतीने दाखवण्यात येणार आहे . ट्यशास्त्राच्या ‘मेक बिलिव्ह थिअरी’ वर हे नाटक आधारित असून ह्या नाटकामध्ये ‘लक्ष्मीकांत बेर्डे ‘ ह्यांची भूमिका वैष्ट्यपूर्ण पद्धतीने साकारण्यात येणार आहे . लक्ष्याचा संपूर्ण जीवन प्रवास हा पुरुषोत्तम बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोन भावंडांमध्ये होणाऱ्या फोन वरच्या संवादातून हा संपूर्ण जीवन प्रवास प्रेक्षकांच्या समोर येणार आहे .  हे नाटक ‘ १६ डिसेंबरला ‘ लक्ष्याच्या पुण्यतिथीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . सध्या नाटकाची तालीम जोराने सुरु आहे.