झाकीर नाईकच्या पुणे,मुंबईतील संपत्तीवर ईडीची टाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थात आयआरएसचा संस्थापकीय अध्यक्ष ,वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक याच्या १६.४० कोटी रुपयांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त आणली आहे. अवैध संपत्ती प्रतिबंध कायद्यांतर्गत (प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट) ईडीने ही कारवाई केल्याचे आर्थिक तपास संस्थेने सांगितले. पुणे आणि मुंबई येथील त्यांच्या संपत्तीवर जप्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २६ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात नाईक आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर ईडीने तपास सुरू केला होता.

नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनकडे अनेक द्वेष पसरवणाऱ्या भाषणांचा साठा आढळला. या कामांमुळेच संस्थेला अनेक अज्ञातांकडून आर्थिक मदत मिळत आहे, असे ईडीने म्हटले आहे. झाकीर नाईक जाणीवपूर्वक हिंदू, ख्रिश्चनांच्या धार्मिक श्रद्धांचा अनादर करतात. या धर्मीयांच्या भावनेचा विचार न करता नाईक त्यांच्यावर टीका करतात, असे एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. झाकीर नाईक (५२) सध्या मलेशियात वास्तव्यास आहेत.

झाकीर नाईक आहे तरी कोण?

– झाकिरचा जन्म १८ ऑक्टोबर १९६५ रोजी मुंबईत झाला होता.

– त्याने एमबीबीएस पदवी घेतली आहे. झाकीर एक मुस्लिम धर्मगुरु, रायटर आणि प्रवक्ता आहे.
– याशिवाय तो इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थात आयआरएसचा संस्थापकीय अध्यक्ष आहे.
– फेसबुकवर त्याचे १ कोटींच्या वर फॉलोअर आहेत. झाकीरवर यूके, कॅनडा, मलेशियासह ५ देशांमध्ये बंदी आहे.
– इस्लामिक फाउंडेशनला देश-विदेशातून भरपूर निधी मिळतो.
– तो एक शाळा चालवत होता. त्यात लेक्चर, ट्रेनिंग, हाफिज बनवण्यासाठी क्लास आणि इस्लामिक ओरिएंटेशन प्रोग्राम चालवतो.
– पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने २०१२ नंतर त्याने मुंबईत कोणतीही कॉन्फ्ररन्स घेतली नाही.