#MeToo मोहिमेमुळे ‘हा’ अभिनेता झाला सावध

मुंबई : वृत्तसंस्था

हॉलिवूडचे #MeToo वादळ बॉलिवूडमध्ये धडकल्यावर फिल्म इंडस्ट्रीमधील काही कलाकार चांगलेच अडचणीत आले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप करून जोरदार धक्का दिला आणि एका पाठोपाठ एक असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे ‘मी टू’ च्या मोहिमेमुळं बॉलिवूडमधील काही पुरुष लोक खूपच सावध झाले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae589b0b-cd45-11e8-9065-1d25df0d84cb’]

लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळं सध्या बॉलिवूडला ग्रासलं असून अनेक कलाकार त्यावर व्यक्तही होत आहेत. काही कलाकार वादात न पडता मूळ समस्या विचारात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ अशी ओळख असलेल्या इमरान हाशमी यानंही मुद्द्याला भिडण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेता इम्रान इमरान हाशमीने स्वत:बरोबरच क्रू मेंबर्ससोबत होणाऱ्या करारात लैंगिक शोषणासंदर्भातलं कलम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महिलांना सुरक्षितता देण्याची तसंच, पुरुषांना मर्यादा ओलांडण्यापासून रोखण्याची तरतूद या कलमात असेल, असं बोललं जात आहे. इम्रान हाश्मीनं भूषण कुमार, अतुल कसबेकर आणि तनुज गर्ग यांच्यासोबत चित्रपट निर्मिती करत आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b71d0595-cd45-11e8-91da-35a2b5248ce6′]

इम्रान हाश्मी म्हणाला की, “सध्या जे काही वाद सुरू आहेत. त्याविषयी माझं वकिलांशी बोलणं सुरू आहे. यापुढं निर्माता कंपन्यांसोबत करार करताना अन्य नियमांसह लैंगिक शोषणाला आळा घालणाऱ्या नियमांचा करारात समावेश करण्याचं मी ठरवलं आहे. अर्थात, सध्या हे सगळं चर्चेच्या पातळीवर आहे. मात्र, हे नियम कार्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधातील कायद्याला अनुसरून असतील.”
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd540e93-cd45-11e8-a942-9f89e87ea70a’]

‘मल्टीनॅशनल कंपन्यांसह अनेक क्षेत्रातील कंपन्यांच्या कंत्राटात हे नियम असतात. पण आतापर्यंत एकाही चित्रपट निर्माती कंपनीने याची अंमलबजावणी केलेली नाही. ‘मी टू’ मोहीम आणि एकूणच परिस्थिती पाहता करारात या संदर्भातील नियमावली स्पष्टपणे नमूद असणं ही काळाची गरज आहे. किमान माझ्या कंपनीत तरी सर्व पुरुष, महिला कलाकार आणि क्रू मेंबर्सच्या हिताच्या दृष्टीनं ही नियमावली असेल,’ असंही तो म्हणाला.