मनी लाँडरिंग प्रकरणात वधेरा यांची पुःन्हा चौकशी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मनी लाँडरिंग प्रकरणात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वधेरा याना आज ईडीने पुन्हा चौकशीसाठी  बोलावले आहे. गुरुवारी त्यांची सहा तास चौकशी झाली होती. आतापर्यत त्यांची ३ वेळा चौकशी झाली आहे. यांच्यावर प्रदेशात गैरमार्गाने संपत्ती कमावल्याचा आरोप आहे.

‘ईडी’च्या पथकाने वधेरा यांचे म्हणणे दोनवेळा नोंदवून घेतले आहे. रॉबर्ट वधेरा यांना गेल्या बुधवारी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते.  त्यावेळी त्यांना प्रियांका गांधी त्यांना  सोडण्यासाठी  गेल्या होत्या. यावरून त्या आपले पती आणि कुटुंबियाच्या मागे खंबीर उभ्या असल्याचे दिसून आले.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वधेरा यांची चौकशी झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, मी माझ्या कुटुंबासोबत आहे. वधेरा यांच्यावर जे आरोप झाले आहेत, ते खोटे आहेत. तरीही चौकशीला आम्ही सहकार्य केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.