कुंभमेळ्यामध्ये तब्बल १० हजार उच्चशिक्षीतांनी घेतली नागा साधूची दीक्षा

प्रयागराज : वृत्तसंस्था – उत्तर प्रेदशातील प्रयागराज येथे सुरु असलेला कुंभमेळा सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. या अंतिम टप्प्यात तब्बल १० हजार उच्चशिक्षीतांनी नागा साधूची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेणाऱ्यांमध्ये इंजिनिअर आणि एमबीए पदवीधारकांचा समावेश आहे. सनातन धर्मामध्ये नागा साधू बनणे सर्वात कठीण आहे. तरी दखेली पदवीधरांनी नागा साधू बनण्याची दीक्षा घेतल्याने आर्श्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कुंभमेळ्यामध्ये नागा साधूची दीक्षा घेतलेल्यामध्ये २९ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्याने युक्रेनमधून मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. तर उज्जैन येथील बारावीचा टॉपर असलेल्या तरुणानेही या कुंभमेळ्यात नागा साधूची दीक्षा घेतली आहे. या सर्वांनी मोह-माया टाळून नागा साधूची दीक्षा घेतली आहे. तर मरीन इंजिनिअर असलेल्या २७ वर्षीय रजत कुमार या तरुणाने मोठ्या पगाराची नोकरी सोडून नागा साधूची दीक्षा घेतली आहे. या तीन उच्च शिक्षीतांसह १० हजार जणांनी या वर्षीच्या कुंभमेळ्यात नागा साधूची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेतलेल्या तरुणांनी आपले केस अर्पण करुन रात्रभर ओम नम:शिवायचा जपही केला.

नागा साधू बनण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम घ्यावे लागतात. त्यानंतर सहा वर्षानंतर नागा साधू बनता येते. नागा साधूची दीक्षा घेणाऱ्या नवीन सदस्याला फक्त लंगोटी परिधान करावी लागते.लंगोटी शिवाय इतर कोणतेही वस्त्र परिधान करण्याची परवानी त्याला नसते. कुंभ मेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा साधूमधील नवे सदस्य त्यांचा लंगोटाचा त्याग करु शकतात. नागा साधू दिवसातून फक्त एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे सात घरे फिरुन भीक्षा मागावी लागते. जर भीक्षा मिळाली नाही तर त्यांना उपाशी रहावे लागते. नागा साधू हे फक्त जमिनीवरच झोपतात. त्यामुळे नवीन सदस्याला देखील आपले संपूर्ण आयुष्य जमिनीवरच झोपावे लागते.