लोकसभा निवडणूक २०१९ : राष्ट्रवादी कडून जळगावमध्ये ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निश्चित करणे सुरु केले आहे. याचदरम्यान जळगाव येथून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब झाला आहे.

काही दिवसांवरच आगामी लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. इतकेच नव्हे तर. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना-भाजपाने युतीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोणत्या लोकसभा मतदार संघातुन कोणाला जागा मिळते हे जाणून घेण्यासाठी सर्वच इच्छुक असतात याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव लोकसभा मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना त्यासंदर्भात फोन केल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर, पक्षश्रेष्ठीनी त्यांना फोन करुन, तुमची उमेदवारी फायनल झाली आहे. तुम्ही कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीला गुलाबराव देवकर यांनी सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी गुलाबराव देवकर यांना आग्रह करण्यात येत होता, त्यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याने त्यांनी अनेकवेळा पक्ष नेतृत्वाला नकार दिला होता. मात्र, पक्षश्रेष्ठीनी यासंदर्भांत आदेशच दिला आहे त्यामुळे त्यांनी तयारी सुरू केली आहे.