पोलिसनामा विशेष : पुणे महापालिका जुन्या इमारतीचा आणखी ‘विस्तार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महापालिका भवनची नवीन ईमारत अद्याप पुर्ण वापरात येतेय न येतेय तोच जुन्या इमारतिच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या इमारतीतील चाैथ्या मजल्यावरील आयुक्त कार्यलगतच्या टेरेसवर ‘सिटी कमांड सेटर’ च्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

पुणे महापालिकेची जुनी इमारत १९६० मध्ये बांधण्यात आली आहे. परंतु महापालिकेच्या कामकाजाचा व्याप जसा वाढत गेला तस तसे इमारतीचा विस्तार करण्यात आला आहे. आतापर्यंत जुन्या इमारतीचा तीन वेळा विस्तार करण्यात आला असून नुकतेच या इमारतीच्या मागील बाजूस सुमारे ६० कोटी खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन इमारतीमध्ये सभागृह आणि पक्षनेते आणि विविध समित्यांची कार्यालय व बैठक हॉल तयार करण्यात आले आहेत. या इमारतीचे सहा महिन्यांपूर्वी उदघाटन झाले आहे, मात्र स्थलांतर अद्याप बाकी आहे.

राष्ट्रवादीचा ‘तो’ सदस्य ४ जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार !

परंतु प्रशासनाने त्याचवेळी जुन्या इमारतीतील चाैथ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालगतच्या टेरेसवर सिटी कमांड सेंटर साठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची तयारी केली आहे. महापालिकेने सहा वर्षांपासून इ गव्हर्नन्स चा वापर सुरू केला आहे. महापालिकेचा स्मार्ट सिटी मिशन प्रकल्पात समावेश झाल्यानंतर ई गव्हर्नन्सचा वापर अधिकच वाढला आहे. आजमितीला नागरीकांच्या ऑनलाइन तक्रारीसोबत ऑनलाइन सेवा देण्यास प्रारंभ झाला आहे. यापुढे जाऊन प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन व अन्य महत्वपूर्ण सेवांमध्ये ई प्रणालीचा वापर वाढविला आहे. भविष्यात दैनंदिन कामकाजात वाढत जाणाऱ्या इंटरनेटचा वापर अधिकाधीक वाढत जाणार असल्याने पालिकेने यासाठी मुख्य इमारतीतच स्वतंत्र कार्यालय अर्थात कमांड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला  आहे.

आयुक्त कार्यालयालगतच या सेंटर चे कार्यालय राहील. याठिकाणी जाण्यासाठी नवीन इमारतीतील चाैथ्या मजल्यावरून प्रवेशद्वार राहील. नवीन इमारत बांधताना यासाठी तशी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन अद्ययावत कमांड सेंटर च्या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून लवकरच हे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यानी दिली.