BSNLचा धमाका; 399 रूपयांच्या प्लानवर मिळणार तब्बल एवढा डाटा

नवी दिल्ली:वृत्तसंस्था- टेलिकॉम क्षेत्रात कमालीची शर्यत चालू असते. रोज ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन बाजारात येत असतात. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे.आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. या 399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांना दररोज 3.12 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच, या प्लॅनची मर्यादा 74 दिवसांची आहे. म्हणजे ग्राहकांना एकूण २३७.५४ जीबी डेटा मिळणार आहे.

सुरुवातीला ३९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर बीएसएनएलच्या ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा मिळत होता. मात्र, आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. आणि आपल्या ग्राहकांना अधिक डेटा वाढवून दिला आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना दररोज ३.१२ जीबी डेटा मिळणार आहे. या रिचार्जवर ग्राहकांना एकूण २३७.५४ जीबी डेटा वापरता येणार आहे. यापुर्वीच्या प्लॅननुसार ग्राहकांना फक्त ७४ जीबी डेटा मिळत होता.

दरम्यान, या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा तर मिळणारच आहे. त्यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलसह दररोज १०० एसएमएस मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनवर ३१ जानेवारीपर्यंत दररोज ३.१२ जीबी मिळणार आहे. याचबरोबर, बीएसएनएलने गेल्या काही दिवसांपूर्वी ३६५ दिवसांच्या मर्यादा असलेला १३१२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन वर्षभरासाठी असून यामध्ये ग्राहकांना ५ जीबी डेटा मिळणार आहे.