स्वयंपाक करताना स्फोट, मुलगी गंभीर भाजली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गालगत बावधन येथील मर्सडीजब्रेंझ कंपनीच्या शोरूमच्या पाठीमागे चुलीवर स्वयंपाक करत असताना पालामध्ये स्फोट झाला. यामध्ये १३ ते १५ वर्षाची मुलगी गंभीर भाजली आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे.

बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास स्फोट झाला आहे. बाहेरून उदरनिर्वाह करण्यासाठी येऊन मोकळ्या जागेत पाल ठोकून हे कुटुंब राहिले आहे. आज दुपारी अचानक स्फोट होऊन एक मुलगी गंभीररित्या भाजली आहे. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नक्की स्फोट कशाचा होता हे अद्याप स्पष्ट होत नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eabb3053-c6e0-11e8-ab87-2b9b76c27a75′]

हसीना नावाची मुलगी जखमी झाली आहे. हसीना आणि त्यांचे कुटुंब लमानी जातीमधील आहेत. ते उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी काम करून आपले पोट भारतात. हसीना ती राहत असलेल्या पालामध्ये चुलीवर स्वयंपाक करत होती. दुपारच्या सुमारास अचानक चुलीतून मोठा स्फोट झाला. आवाजही मोठा झाला. यामुळे लागलेल्या आगीत हसीनाही गंभीररित्या भाजली आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf1cffc9-c6e1-11e8-bda3-7b7c93be0c4c’]

हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमी हसीनाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच बॉम्ब शोधक व निकामी पथक, ठसे तज्ञ यांना बोलावले आहे. स्फोट नक्की कश्यामुळे झाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

जाहिरात