महात्मा गांधींचे विचार ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी ७ दिवसीय ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट’चे आयोजन

नांदेड | पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – महात्मा गांधी यांचे विचार ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ‘महात्मा गांधी नॅशनल कॉन्सील अॉफ रुरल एज्युकेशन’ मार्फत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र संकुलामध्ये दि.१९ ते २४ नोव्हेंबर या दरम्यान विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षकांसाठी सात दिवशीय फॅकल्टी डव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांचे विचार ग्रामीण भागात रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यासाठी शिक्षक प्रशिक्षकांना तयार करण्याचे काम या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.महेश जोशी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षक प्रशिक्षकांनी या सात दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संकुलाच्या संचालिका डॉ. वैजयंता पाटील यांनी केले आहे.
डोंगरसोनीत पाण्यासाठी नेत्यांना गावबंदी ?
तासगाव : तासगाव तालुक्याच्या पुर्वेकडील सावळज, डोंगरसोनी व लोकरेवाडी गावांचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात अधिकृत समावेश होत नसेल तर नेत्यांना गावबंदी करण्यासाठी आणि मतदानावर बहिष्कार टाकणेसंदर्भात चर्चा करण्यासाठी डोंगरसोनी येथे उद्या  (दि १९)  विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याच्या प्रतिक्षेत दोन पिढ्या खपल्या परंतू आपल्याला नेमके कोणत्या योजनेचे पाणी मिळणार हेच अजून जनतेला माहित नाही. अजूनही भागातील द्राक्षबागायतदारांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
माजी गृहमंत्री स्व. आर. आर. आबांनी सावळज आणि परिसरातील आठ गावांना टेंभूचे पाणी देण्याची आशा दाखवली होती. त्यांच्या पश्चात खासदार संजय पाटील यांनीही टेंभूचे गाजर दाखवले. परंतू प्रत्यक्षात आश्वासने देण्याच्या पलीकडे नेत्यांनी कांहीच दिले नाही. पुर्वभागातील गावांचा टेंभू योजनेत समावेश झाला असल्याचा अध्यादेश लवकरच निघणार अशी चर्चा सुरू आहे. अशातच ही गावे आता म्हैसाळ योजनेत समाविष्ठ होणार असल्याची आवई उठवण्यात आली आहे. यामुळे लोकांचा संभ्रम आणखी वाढला आहे.
या परिस्थितीमुळे पाण्याची आशा धुसर झाल्याने लोक आक्रमक झाले आहेत. गट -तट, पक्ष आणि राजकारण बाजूला ठेऊन ते एकत्रीत आले आहेत. लोकप्रतिनिधी इतक्या वर्षात शेतीला पाणी देऊ शकले नाहीत. नेत्यांना गावबंदी करण्याचा तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासाठी आज सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत कार्यालयात या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.