फडणवीसांचे मोदींना साकडे ; दुष्काळग्रस्तांना निधी लवकर द्या 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते आज एन एच २११ महामार्गाचे उदघाटन करण्यात आले आहे. हा रस्ता सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद असा बनवण्यात आला आहे.  या कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनी सोलापूर साठी केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. त्यानंतर त्यांनी मोदींनी दुष्काळ पाहणीसाठी पाठवलेल्या समितीचे काम मर्यादित वेळेत पूर्ण केले त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. दुष्काळ समितीने पाहणी करून तयार केलेल्या अहवालाच्या आधारावर दुष्काळग्रस्तांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी असे साकडे देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना घातले आहे.

महाराष्ट्र या वर्षी  मोठ्या दुष्काळाचा सामना करत आहे. अद्याप सरकारच्या वतीने कसलीच मदत करण्यात आलेली नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या बद्दल नाराजी आहे. याच नाराजीला दाखवून देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. केंद्राचा निधी येताच तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.  यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या सभेत सामान्य लोकांच्या साक्षीने नरेंद्र मोदी यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.

सवर्णांना आरक्षण नको, खात्यात १५ लाख टाका : खासदार तंबी दुराई