अजब !… म्हणून शेतकरी  संघटनेने उधळल्या नोटा 

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन – शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याची कबुली साखर कारखानदारांनी दिली असताना आता साखर कारखाने सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप कसलीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नझाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी सांघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर नोटा उधळत कारखानदारांचा निषेध व्यक्त केला आहे.

शेतकरी संघटनेने उधळलेल्या नोटा या खोट्या होत्या असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींच्या वतीने सांगण्यात आले आहे. चालू गळीत हंगाम सुरु होऊन दिड महिना झाला असून सुद्धा अद्याप कसलीही रक्कम कारखानदारांच्या वतीने देण्यात आली नाही. ती रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनासाठी शेतकरी संघटनेचे  जिल्हाप्रमुख विकास देशमुख, जिल्हाउपप्रमुख महावीर पाटील, जयकुमार कोले, संदीप चौगुले, सनी गडगे, संजय खोलकुंबे आदी पदाधिकाऱ्यांनी  सहभाग नोंदवला होते. यावेळी आंदोलकांनी कारखानदारांचा आणि राज्य सरकारचा  निषेध करत हवेत नोटा उधळल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरु असून त्यांनी हवेत नोटा उधळून नंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले त्यात त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एफआरपीची रक्कम वर्ग करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम -पाटील यांना केली आहे. जिल्हाधिकारी काळम -पाटील यांनी हि शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आंदोलकांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून आंदोलकांची मागणी साखर आयुक्ताकडे पोच करू असे सांगितले आहे.

या आंदोलना प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी महावीर पाटील यांनी संवाद साधला ते म्हणाले कि , कारखाने सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी अद्याप साखर कारखानदारांनी एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आला नाही, दुष्काळात शेतकरी होरपळत असताना कारखानदार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे कानाडोळा करत आहेत येत्या काळात आमच्या मागण्यांकडे लक्ष नघातल्यास आगामी काळात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असे महावीर पाटील या वेळी म्हणाले.