राकेश ओम प्रकाश यांच्या चित्रपटात ‘हा’ अभिनेता दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत

मुंबई : वृत्तसंस्था – ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटानंतर अभिनेता फरहान अख्तर सहा वर्षानंतर पुन्हा एकदा राकेश मेहरा यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘तूफान’ असून हा चित्रपट बायोपिक नाही. परंतु हा चित्रपट बॉक्सिंग वर आधारित असणार आहे. चित्रपटात फरहान अख्तर हा बॉक्सरच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

याविषयी फरहानने ट्विट करत सांगितले, ‘भाग मिल्खा भाग चित्रपटानंतर मी राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या सोबत तूफान चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाची कथा एका बॉक्सरची असणार आहे. या नवीन प्रवासासाठी तुमच्या शुभेच्छा पाहिजे’

राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी चित्रपटाच्या तयारीला सुरवात केली असून फरहान यासाठी बॉक्सिंगचे प्रशिक्षणही घेत आहे. या  चित्रपटाची निर्मिती फरहान आणि रितेश सिंधवाणी करणार असून चित्रपटाची कथा अंजुम राजाबाली यांची असणार आहे. आणि फरहानला ही कथा खुपच आवडली आहे.

गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये स्पोर्ट्स विषयी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. ‘गोल्ड,’ धोनी : द अनटोल्ड स्टोरी, ‘सूरमा’,’ मैरीकॉम यांसारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

लवकरच फरहान अख्तरचे “द फकीर ऑफ वेनिस” आणि “द स्काई इज पिंक” हे चित्रपट रिलीज होणार आहे.