क्राईम स्टोरी

गोबर गॅसच्या टाकीत गुदमरुन बाप-लेकाचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील घटना 

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – गोबर गॅस टाकीलचा पाईप दुरुस्त करण्यासाठी टाकीत उतरलेल्या मुलाला वाचवण्यासाठी केलेल्या पित्याचा मुलासह दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणे येथे आज सायंकाळी ही घटना घडली.

अजित विष्णू वाखारे (वय 28), विष्णू पोपट वाखारे.(५५, दोघे रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा) ही मयताची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती की, गोबर गँसचा पाईप नादुरुस्त झाल्याने अजित वाखारे हा गैसच्या टाकीत उतरला. काही वेळातच त्याने वडील विष्णू वाखारे यांना जोरात हाक मारली. वडिलांनीही लगेच टाकित उड़ी घेतली. टाकीत पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने बाप-लेकांचा गुदमरुन मृत्यू झाला.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर बराच वेळ हे दोघे कुठे गेले हे कुटूबियांना समजले नाही. घरातील मंडळी व इतर नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. गैस टाकीच्या बाजूला चप्पल व मोबाईल दिसल्याने बांबूच्या सहायाने टाकित शोध घेतला असता अजित टाकित दिसून आला.त्यानंतर त्याचे वडिलही दिसून आले. या दोघांनाही शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले .मात्र डॉक्टरानी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या