क्राईम स्टोरी

पोलिसांवर प्राणघातक हल्ला, ३ पोलिस कर्मचारी जखमी 

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर संशयित तरुणाच्या पित्याने दगडफेक करुन मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शहरातील स्नेहनगरात घडली आहे. यात ३ पोलिस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी संबंधितांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

यासंदर्भात पोना प्रल्हाद सुकदेव वाघ यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुन्ह्यातील पसार संशयित विजय रमेश देवरे हा शहरातील स्नेहनगर, मनपा तलाव परिसरातील आपल्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोना वाघ, पोकॉ कमलेश सुरेश सूर्यवंशी, पंकज विनायक खैरमोडे असे तिघे जण दि.९ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विजय देवरे याच्या शोधासाठी त्याच्या घरी गेले असता विजयचे वडील रमेश उर्फ सम्राट विश्राम देवरे (५५) यांनी पोलिसांवरच हल्ला चढविला.

शासकीय कामात अडथळा आणून दगड फेकून मारले तसेच शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच ॲट्रॉसिटी व महिला अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी तिघे पोलिस कर्मचारी जखमी झाले. यावरुन रमेश देवरेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रमेश देवरे यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शेख याच्या हत्याप्रकरणातील संशयित व सध्या अटकेत असलेला भद्रा याचे रमेश देवरे हे वडील आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या