तुमची कार कधीच चोरी होणार नाही : फक्त 299 रुपयांचे ‘टाळे’ ठोका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चोरीच्या अनेक घटनांमध्ये कार चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. कार ही पार्किंगमधुनही चोरी केली जाते. कार चोरीच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. चोरी झालेल्या कारचं पुढे काय केलं जात हे बऱ्याचदा समजत नाही. यामुळे कार पुन्हा मिळवणे अनेकदा कठीण होऊन बसते. परंतु आता केवळ 299 रुपयांत तुम्ही तुमची कार चोरांपासून सरक्षित करू शकता. एका खास सोपा आणि परवडणारा उपाय वापरून तुम्ही कारचोरी रोखू शकता. ही कारचोरी रोखण्यासाठी एक लॉक येते. चोरट्याने काच फोडली आणि त्यानंतर कार सुरू केली तरी ती पुढे जाऊ शकणार नाही असं हे लाॅक आहे.

हे लाॅक म्हणजे एक गिअर लाॅक आहे. कारण गाडी सुरु करून ती पुढे नेण्यासाठी गिअर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आता गिअरला लाॅक करणे शक्य होणार आहे. या गिअर लाॅकची किंमत खिशाला परवडणारी आहे. या गिअर लॉकची किंमत 299 रुपयांपासून सुरु होते. गुणवत्तेनुसार या लॉकची किंमत 3 हजार रुपयांपर्यंत जाते.

असे काम करते हे लाॅक
सदर गिअर लाॅक म्हणजे एक किट आहे. हे किट गिअर बॉक्सवर बसवले जाते. यामुळे गिअर लाॅक होऊन जातो. किटमध्ये एक हँडल दिला जातो, ज्याला गिअरमध्ये अडकवून किटसोबत लॉक केले जाते. जर कोणी चोर गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये आला आणि गाडी सुरु जरी केली तरीही गिअर टाकू शकणार नाही. यामुळे गाडी एक इंचही पुढे जाऊ शकणार नाही.

लहान मुलांपासुनही सुरक्षा…
बऱ्याचदा घरातील लहान मुले कळत नकळत कारची चावी घेऊन जातात. म्युझिक प्लेअर, हॉर्न सुरु करण्यासाठी चावी कारला लावतात. खेळता खेळता कार सुरु करण्याचा प्रयत्न करतात. यातून अनेकदा अपघातही घडतो. कारण गिअर लाॅक नसल्याने गिअर पडला तर  अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे आता लहान मुलांनाही या लाॅकमुळे सुरक्षा मिळणार आहे. तुम्ही कसलीही काळजी न करता मुलांच्या हातात कारची चावी सोपवू शकता.