शिक्षक सोसायटीच्या नोकरभरती विरोधात संचालकांचे उपोषण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  नोकरभरतीत काही संचालकांच्या नातेवाईकांना नियुक्ती देण्याचा घाट घातल्यामुळे तीन संचालकांनी जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोरच उपोषण सुरू केली आहे. संचालकांनीच सोसायटीचे विरोधात उपोषणाला सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या नोकरभरती प्रकरणाचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. कोणालाही पत्र न देता परस्पररित्या भरती करण्याचा घाट घातला आहे. माध्यमिक शिक्षक बँकेच्या १२ जागांसाठी नोकरभरती करायची होती. ही नोकरभरती करताना संचालक मंडळाने परस्परर आपल्या जवळच्या नातेवाईकांना स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्यांनी भरती प्रक्रियेत अर्ज केला होता. त्यांना बोलावून अवघ्या काही तासांमध्ये त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या नोकरभरतीचा तीन संचालकांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र इतर संचालकांकडून त्यांच्या नातेवाईकांना नियुक्ती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संचालकांनाही सोसायटीच्या आवारातच उपोषणाला सुरुवात केली आहे.

नोकरी प्रक्रिया न्यायप्रविष्ट
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी नोकरभरतीची प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीही संचालक मंडळाने घाईगडबडीत नोकरभरती करण्याचा निर्णय का घेतला, याचा खुलासा करण्याची मागणी उपोषण करणाऱ्या तीन संचालकांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.