शैक्षणिक

डॉक्टर बनायचंय… तर ठेवा कोटीची तयारी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शिक्षण आणखीन महागणार आहे. ही वाढ २५ टक्क्यांपर्यंत असणार आहे. राज्य शुल्क नियमन प्राधिकरणाने (एफआरए) खासगी संस्थांना ७ लाख रुपयांपर्यंत कमीत कमी फी निश्चित केली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील १६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला मोठा भार पडणार आहे.

भारतीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) गरजा पूर्ण करण्यासाठी उपकरणे अपग्रेड करण्यासाठी संस्थांना निधीची गरज असल्याचे मत मांडल्याने आलेल्या प्रस्तावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वैद्यकीय संस्थाकडून दरवर्षी फी संरचना बदलण्यासाठी प्रस्ताव एफआरएकडे सादर केले जातात. नियामक मंडळ फी निश्चित करण्यापूर्वी अभ्यासक्रमाचे स्वरूप, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पायाभूत सोयी आदींचा विचार करुन फीवाढ केली जाते असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना २०१८-१९ मध्ये ७ लाख ५० हजार एमबीबीएसची फी होती आता तीच फी यंदा ९ लाख २५ हजार द्यावी लागणार आहे.

पालकांमध्ये तीव्र नाराजी – या फी वाढीबद्दल पालकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. शुल्क नियंत्रणात आणण्याऐवजी एफआरएने शुल्क वाढीची घोषणा केल्याने पालकांवर आर्थिक ताण पडणार आहे. कर्नाटकसारखी राज्यं समान शुल्क आकारणी प्रक्रिया राबवत असताना तीच प्रक्रिया महाराष्ट्रात का राबवली जात नाही? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

 • शुल्क वाढ झालेल्या महाविद्यालयांची यादी

  महाविद्यालय आधीचे शुल्क नवीन शुल्क

  के. जे. सोमैया मेडिकल कॉलेज, मुंबई             ७,५०,०००    ९,२५,०००
  तेरणा मेडिकल कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई        ५,६१,०००    ७,००,०००
  डॉ. वसंंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक    ६,२५,०००    ७,००,०००
  एसीपीएम मेडिकल कॉलेज, धुळे                     ५,००,०००    ५,२०,०००
  एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट, नागपूर                  ७,८५,०००   ८,८३,०००
  पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती  ७,१५,०००   ८,१२,०००
  एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज, लातूर       ६,००,०००   ७,००,०००
  डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज, नगर           ६,९५,०००  ७,३७,०००
  काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे             १२,००,००० १२,६०,०००

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या