आरोग्य

फर्ग्युसन महाविद्यालय : विद्यार्थीनींसाठी बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक विद्यार्थीनींना काॅलेजमध्ये असताना मासिक पाळी येते. अशा वेळी त्यांच्या आवश्यक असणारे सॅनिटरी नॅपकीन जवळ असतेच असे नाही. यावेळी समस्या निर्माण होते. विद्यार्थींनींच्या आराेग्यासाठी सॅनिटरी नॅपकीन आवश्यक आहे. याच दृष्टीकोनातून पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयाने पाऊल टाकले आहे. महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहेत. याचा मोठा फायदा विद्यार्थीनींना होणार आहे.
सुरुवातीला महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत एक मशीन बसविण्यात आले हाेते. याला विद्यार्थीनींचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसं पाहिलं तर महाविद्यालयाचा परिसर मोठा आहे. शिवाय काॅमप्युटर सायन्स विभाग मुख्य इमारतीपासून दूर आहे. यामुळे त्या विभागातही एक मशीन बसवून देण्याबाबत विद्यार्थीनींकडून मागणी करण्यात आली. प्रशासनाने आठवडाभराच्या आत काॅमप्युटर विभागात आणखी एक सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशिन्स बसविले. प्रशासनाने तात्काळ केलेल्या कारवाईचे विद्यार्थीनींकडून स्वागत करण्यात आले असून महाविद्यालयाचे आभार विद्यार्थीनींनी मानले.
सॅनटरी नॅपकीन बाबत समाजात अजूनही म्हणावी तितकी जागरूकता दिसून येत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान आवश्यक असणारे सॅनिटरी नॅपकीन जवळ नसेल तर मुलींना अडचणीचा सामना करावा लागतो. हेच लक्षात घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयाने हे उपयुक्त पवित्रा घेतला आहे. यामुळे
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या