‘तिने’ चक्क मृत्यू झालेल्या जोडीदाराशी केले लग्न

जकार्ता : वृत्तसंस्था – प्रेमाच्या अनेक घटना आपण वाचल्या ऐकल्या आहेत. प्रेमी युगुलांनी सोबत जगणे सोबत मरणे अशा अनेक घटना आहेत. परंतु मृत व्यक्तीशी विवाह केल्याची घटना तुम्ही नक्कीच ऐकली नसेल. अशीच एक हटके घटना आपण वाचणार आहे. जी तुम्हाला आश्चर्यचकित करून नक्कीच करेल. डोळ्यात पाणी आणेल अशीच काहीशी ही घटना आहे. इंडोनेशियामध्ये  विमानअपघात होऊन यामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला होता. यात एका तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला परंतु या तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी आणि त्याच्याप्रती असणाऱ्या प्रेमाशी एकनिष्ठ राहून तिने आपल्या मृत पतीशीच विवाह केला. त्याची तिच्यासोबत विवाह करण्याची इच्छाही तिने पूर्ण केली.

विमान अपघातात इंडोनेशियाची तरुणी इंटन स्यारी हिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. रियो नंदा प्रतामा असे त्याचे नाव होते. विमानात बसण्याआधी या दोघांचा संवादही झाला होता. त्याने स्यारी हिला फोनवर ”मी जरी आलो नाही, तरीही तू माझ्याशीच लग्न कर” असे सांगितले होते. आणि दुर्दैव की, यानंतर 13 मिनिटांनी विमानाचा अपघात झाला होता. लग्नानंतर पतीसोबत संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या स्यारीने प्रतामाच्या मृत्यूनंतर त्याची ही इच्छा पूर्ण केली. स्यारीने 11 नोव्हेंबरला लग्न ठरलेल्या ठिकाणीच पांढऱ्या पोषाखात जाऊन एकटीनेच लग्न केले.

प्रतामाच्या मृतदेहाची ओळख 6 नोव्हेंबरला पटली. बोटाच्या ठशांनी ही आेळख पटवण्यात आली. यानंतर दोन दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रतामा हा लग्नासाठीच लायन्स एअरलाईनने घरी येत होता आणि या विमान अपघाताचा शिकार झाला.

असा दिला स्यारीने प्रेमाचा संदेश
प्रतामाने विमान उड्डाणाआधी मस्करी करताना म्हटले होते की, की मी 11 नोव्हेंबरला आलो नाही तरीही माझ्याशीच लग्न कर. मी पंसत केलेलाच लग्नाचा पोषाख घाल. मेकअप करून पांढरे गुलाब मागव. यानंतर फोटो काढून मला पाठवून दे. गंमतीनुसार जरी प्रतामा या जगात नसला तरीही स्यारीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याच्यासाठी प्रेमाचा संदेश दिला आहे. ”मी प्रतामाची शेवटची इच्छा पूर्ण करू इच्छिते. त्याला 13 वर्षांपासून ओळखत होती. तो माझे पहिले प्रेम आहे. मी दुख: व्यक्त करू शकत नाही, पण तुझ्यासाठी नेहमी हसत राहीन. तुझ्या सांगण्याप्रमाणे शूर बनण्याचा प्रयत्न करेन.”