मोदींनंतर आता ‘या’ राजकीय नेत्यावरही बायोपिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड जोर धरतो आहे. यातही क्रीडापटू, राजकीय नेते यांच्यावर आधारित अनेक बायोपिक आले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग , आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्यावर आधारित सिनेमे बनले आहेत. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांच्यावर देखील बायोपिक येणार आहे. यानंतर आता आणखी एका नेत्यावर सिनेमा येतो आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आता सिनेमा बनणार आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग भुसारी करणार आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की हा सिनेमा प्रचारासाठी बनला जातोय. पण दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी हे म्हणणं अमान्य केलं. हा सिनेमा खऱ्या घटनांवर असल्याचा दावा दिग्दर्शकानं केला. या सिनेमासंदर्भात त्यांचं गडकरींच्या पत्नीशी बोलणं झालंय. ते नितीन गडकरींच्या लहानपणीच्या मित्रालाही भेटले. ‘गडकरी’ या सिनेमात राहुल चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा ५ मार्चच्या आधी युट्युबवर दाखवला जाणार आहे.

सिनेमात वास्तवच दाखवलंय : भुसारी
दिग्दर्शक अनुराग भुसारी यांच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमात गडकरी यांच्या जीवनाला योग्य प्रकारे दाखवलं गेलंय. एका माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, ‘नुकतेच राजकारण्यांवर सिनेमे रिलीज झाले. लोकांनी म्हटलं ते प्रचारासाठी बनले. पण हा सिनेमा वास्तवावर आहे.अनुराग म्हणाला, ‘ मी सिनेमात गडकरी किती चांगले आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांचा संघर्षच सिनेमात दाखवलाय. त्या संदर्भातल्या घटना दाखवल्यात. त्यांचं आयुष्य, राजकीय प्रवास आणि त्यांचा केंद्रीय मंत्री बनण्याचा प्रवास दाखवलाय.’

अनुरागनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रोजेक्टवर काम करणं सुरू केलं होतं. सहा महिन्यांच्या रिसर्चनंतर त्यानं दोन महिन्यात सिनेमा पूर्ण केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा सिनेमा क्राऊड फंडिंगनं बनला आहे. ते म्हणाले, गडकरींसारख्या नेत्याच्या नावावर कुणीही निर्माता तयार झाला असता, पण मग पटकथेवर दबाव येऊ शकला असता. म्हणून पैसे गोळा करून सिनेमा बनवला.

इथं मिळतं पाकिस्तानच्या झेंड्यासोबत माचीस आणि लायटर फ्री
‘आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करणार’ : प्रकाश आंबेडकर