फायनली…ऑटो क्लस्टर मधूनच चालणार आयुक्तालय

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासाठी नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार फायनली काही दिवसांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथूनच चालणार आहे. तर आयुक्तालयाचे पहिले ध्वजारोहण चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणार आहे. त्यानंतर कंट्रोल रूमला कॉल करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू होईल.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40751175-9f1a-11e8-bf5b-35d4562f84ac’]

पहिल्या ध्वजारोहणासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पालकमंत्री गिरीश बापट, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी (दि. 15) सकाळी दहाच्या सुमारास आयुक्तालयाचे ध्वजारोहण होणार आहे. यानंतर उपस्थितांची एक बैठक पार पडणार आहे. आयुक्तालयासाठी मिळालेल्या प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे नूतनीकरणाचे काम वेगात सुरु आहे. संपूर्ण काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात येणार आहे. आयुक्तालयाची सर्व सूत्रे ऑटो क्लस्टर मधून हलणार आहेत.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45aa3a66-9f1a-11e8-b42b-55f4a94225ab’]

ऑटो क्लस्टर मध्ये दोन केबिन आणि एक हॉल पालिकेने पोलीस आयुक्तालयासाठी दिला आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय असणार आहे. तसेच मुख्यालयाचे उपायुक्त विनायक ढाकणे हेही या ठिकाणी बसणार आहेत. सध्याच्या पुणे शहर आयुक्तालयाचे परिमंडळ तीन पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या इमारतीचे देखील नुतणीकरणाचे काम सुरु आहे. या कार्यालयात झोन एक आणि झोन दोनचे पोलीस उप आयुक्त बसणार असल्याची माहिती विश्वासनियसूत्रांनी दिली आहे.