लाज वाटणारी शॉर्टफिल्म काढणे भोजपुरी अ‍ॅक्टरला पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील कोंढवा भागात भोजपुरी चित्रपटातील गायक आणि अभिनेते, दिग्दर्शक म्हणून काम केलेले अलोकश्री गुप्ता यांच्या वर एका महिलेने आरोप केला असून अद्याप गुप्ता यांना अटक झाली नाही, सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी महिलेची आणि आरोपी अलोकश्री गुप्ता यांची फेसबुक वर ओळख झाली.

ती ओळख मैत्रीत रूपांतरित होताच गुप्ता यांनी फिर्यादी महिलेस कामाचं आमिष देत मुंबईला बोलवलं आणि फिर्यादी महिलेच्या सांगण्याप्रमाणे अत्यंत अश्लील अश्या शॉर्टफिल्मसाठी त्या महिलेकडून काम करून घेतलं, महिलेने नकार दिल्यास ”आता तुझ्या करियरची सुरुवात आहे” अशी समजूत काढून शूट पूर्ण केले, पालघरमधील एका बंगल्यात याचे शूटिंग करण्यात आले. ज्यामुळे फिर्यादी महिलेस स्वतःला स्वतःची लाज वाटेली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हि महिला २०१५  मध्ये पुण्यात ऍक्टिंग आणि मॉडेल म्हणून काम करत होती.

याशिवाय आरोपीने तिच्या परवानगीशिवाय ती शॉर्टफिल्म यूट्यूब आणि स्पेशल इंडिया भोजपुरी वेबसाईट वर अपलोड करून महिलेची बदनामी केली, आणि तिची फसवणूक हि केली असल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

त्यानुसार अलोकश्री गुप्ता यांच्यावर ३५४ कलमानवये अत्याचार आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न , आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक झाली नसून, पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहे.