pulwama Attack : ‘हाउज द् जैश’ लिहिणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अलीगड : वृत्तसंस्था- काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर ‘हाउज द जैश’, ग्रेट सर अशी पोस्ट ट्विटरवर समोर आली. ही पोस्ट लिहिणाऱ्याविरुद्ध गोविंद वल्लभ पंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसीम हिलाल असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तेसच या विद्यार्थ्याला विद्यापीठाने निलंबित केले आहे.

बसीम हिलालने ट्विटरवर आक्षेपार्ह असे ‘हाउज द जैश’, ग्रेट सर असे ट्विट केले होते. रात्री उशीरा हे ट्विट डिलीट करण्यात आले. बसीम हिलालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप चाणक्य  यांनी याबाबत माहिती दिली आहे. बसीम हिलाल हा अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. बसीम हा अलीगड मुस्लिम विद्यापीठात एमएससीचे शिक्षण घेत होता. दरम्यान त्याच्या या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुष्पेंद्र पचौरी यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

 ट्विटरवरून समोर आलेल्या माहितीनुसार, बसीम हिलाल हा एएमयूच्या गणित विभागाचा विद्यार्थी आहे. त्याचे ट्विट समोर आल्यानंतर काही वेळानंतर  मात्र हे ट्विटर अकाउंट डिलीट करण्यात आले. हे अकाउंट खरे आहे की भावना भडकावण्यासाठी केलेले ट्विट आहे, याचा तपास पोलीस करत आहे असेही समजत आहे. या घटनेनंतर आता अलीगड मुस्लिम विद्यापीठात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने घेतली होती. त्यानंतर बसीम हिलालने ट्विटरवर आक्षेपार्ह असे ‘हाउज द जैश’, ग्रेट सर असे ट्विट केले होते.