ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

पुण्यातील चित्रपट गृहात आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या श्रीकृष्ण थिएटरमध्ये आग लागली आहे. आगिची माहित मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही घटना आज (गुरुवार) दुपारी चारच्या सुमारास घडली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

बुधवार पेठीतील श्रीकष्ण थिएटरमध्ये आज चारच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने हे  थिएटर बंद असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या थिएटरमध्ये लागलेल्या आगिमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अरुंध रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना या ठिकाणी पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच या घटनेमुळे वाहतुक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या