भिवंडीत गोदामाला भीषण आग, १० गोदाम जळून खाक

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाहीयत अंधेरीच्या कामगार रुग्णालयाच्या घटनेनंतर आता भिवंडी तालुक्यातील गुंदवली ग्रामपंचायतच्या हद्दीतील कृष्णा कॉम्प्लेक्स मधील गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून धुराचे लोट ५ किलोमीटर पर्यंत पाहायला मिळत आहे.
आगीत कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावरील १० गोदाम जळून खाक झाली आहेत. या गोदामात पेपर आणि प्लास्टिकची खेळणी असल्याचे माहिती समोर येत आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. या घटनेत अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती नाही.