सुंदर दिसण्यासाठी  ‘या’ देशात करतात फायर थेरपीचा वापर

लंडन : वृत्तसंस्था – आपला चेहरा सुंदर दिसावा, असे न वाटणारी स्त्री दुर्मीळच म्हणावी लागेल. त्यासाठी प्रत्येक उपाय करणाऱ्या अनेक  महिला आणि पुरुषही  आहेत. आपण सुंदर दिसावं, आपला रंग गोरा असावा, हा गोरा रंग मिळवण्यासाठी  महिला आपल्या चेहऱ्यावर  मेकअपचा भडीमार करतात तर काही जणं कॉस्मॅटिक उत्पादक वापरतात. तर अनेक  जणं सर्जरी करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतात.

व्हीएतनाममध्ये त्यासाठी एक खतरनाक उपायही केला जातो. चेहरा सुंदर दिसावा म्हणून तिथे चक्‍क फायर थेरपी करण्यात येते. या मध्ये चुकून जरी काही चूक झाली तरी चेहरा भाजू शकतो. हे माहिती असूनही अनेक इच्छुक ही थेरपी घेतात ! या देशात अश्या प्रकारची चाललेली थेरपी तर दुसरीकडे  काही दिवसापूर्वी एका देशात महिलेकडून नो मेकअप  मोहीम राबवण्यात आली होती.

अशी केली जाते फायर थेरपी

ही थेरपी केवळ सौंदर्यवृद्धीसाठीच नव्हे, तर अन्यही काही कारणांसाठी केली जाते. या थेरपी साठी एक विशिष्ट तंत्र वापरले जाते. त्यामध्ये अल्कोहोल शिंपडलेल्या एका टॉवेलखाली चेहरा तीस सेकंद ते एक मिनिटासाठी झाकून ठेवला जातो. आगीमुळे चेहर्‍याला झळ पोहोचू नये, यासाठी या टॉवेलखाली आणखी एक टॉवेल ठेवला जातो. त्यानंतर पुढील बाजूने फायर फ्लेम दिला जातो. अर्थातच ही थेरपी प्रशिक्षित व्यक्‍तींकडूनच दिली जाते. या थेरपीत चेहर्‍याच्या त्वचेला ऊब दिली जाते. त्यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात किंवा सुरकुत्या वाढण्याचा वेग कमी होतो, असे तिकडे मानले जाते.