माजी नगरसेवकावर गोळीबार 

जळगाव : पोलीसानामा ऑनलाईन – जळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर सोमवारी सकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. समोरून वार केल्याने गोळी संतोष पाटील यांच्या थेट छातीत घुसली आहे. उपचारासाठी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले . त्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना  जळगाव शहरातील आर्यनपार्क जवळ सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडल्याचे समजते.

संतोष पाटील हे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे. ते मनसेचे माजी नगरसेवक असून त्यांच्या पत्नी यावेळी भाजपाकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. हल्ला झाल्याची माहिती मिळताच त्यांचे समर्थकांनी तसेच भाजपच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.