कोंढव्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आर्थिक वादातून कोंढवा परिसरातील मिठानगरमध्ये भरदिवसा गोळीबार केल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

विजय गुप्ता आणि शाम (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिठानगरमधील गल्ली नंबर ४२ मध्ये गोळीबाराचा हा थरार घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्थिक वादातून दोन गटामध्ये वाद होऊन गोळीबार झाला. घटनेनंतर गोळीबार करणारे फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असून मागिल काही दिवसापासून पुण्यात किरकोळ कारणावरुन खुनाचेही प्रकार घडले आहेत. सिहंगड रोडवर पार्टीत शर्ट फाडल्याच्या कारणावरुन तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आला. भर दिवसा खूनचा प्रकार घडल्यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. तर बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून एका तरुणाचा कोयत्याने खून करण्यात आला होता. आजच्या घटनेवरुन पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.