पोलीस घडामोडी

पोलीस गोळीबार प्रशिक्षण केंद्रातुन सुटलेली गोळी थेट विद्यार्थ्याच्या मांडीत 

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस गोळीबार प्रशिक्षण केंद्रात गोळीबाराचे प्रशिक्षण घेत असताना पोलिसांचा निशाणा चुकल्याने सुटलेली गोळी थेट एका युवकाच्या पायाला लागली. दरम्यान तो गंभीर जखमी झाला असून, औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात उपचार चालू आहेत. नितीन विष्णू पुंड ( १६ ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यापासून २ किमी अंतरावर असलेल्या मैनपूर या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. दरम्यान विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणासाठी त्या प्रशिक्षण केंद्रात येतात. विशेष म्हणजे ११ जानेवारी रोजी गोळीबाराचे प्रशिक्षण सुरू असतांना एक गोळी भिंतीच्या वरून सुटली. दरम्यान तिथे असलेल्या नवोदय वसतिगृहात एक युवक जेवत होता. त्यावेळी सुटलेली ती गोळी थेट त्या यवकाच्या पायात घुसली. दरम्यान तो गंभीर जखमी झाला असून. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडत जात असल्या कारणाने त्याला तात्काळ औरंगाबाद येथील सिग्मा या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जखमी युवकावर उपचार सुरु आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या पायातील गोळी काढून टाकली आहे. परंतु या घटनेत नितीन जबर जखमी झाला आहे.

विशेष म्हणजे या घटनेची कोणतीही नोंद जिंतूर पोलिसांत नसल्याची टोलवाटोलवी पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी केली. मात्र जखमी नितीनसोबत पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी सोबत होता. असे वृत्त आले आहे.

विशेष म्हणजे  या प्रकरणातील गंभीर चूक लक्षात घेता, पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे तर या घटनेची कोठेही नोंद घेतलेली नाही. तसेच तक्रार देऊ नये म्हणून पालकांची समजूत घातली जात असून जखमी मुलाचा खर्च देखील पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या