क्राईम स्टोरी

पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील एसीबीची पहिली कारवाई

रिक्षाचालकाकडून लाच घेताना हिंजवडी वाहतुक विभागासमोर खासगी व्यक्ती जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिंजवडी ते वाकड दरम्यान प्रवासी वाहन चालविण्यासाठी रिक्षालकाकडून वाहतुक पोलिसांना हप्ता देण्यासाठी २ हजार ६०० रुपये  स्विकारताना खासगी व्यक्तीला लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचून हिंजवडी वाहतुक विभागाच्या कार्यलयासमोर रंगेहात पकडले. पिंपरी चिंचवड आयुक्तालय सुरु झाल्यानंतर एसीबीची ही पहिलीच कारवाई आहे.

भालचंद्र संदीपान कानडे (वय38 वर्ष रा शिंदे वस्ती म्हारुंजी पुणे) असे रंगेहात पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांचा हिंजवडी ते वाकड प्रवासी वाहन चालविण्याचा व्यवसाय आहे. त्यांची दोन वाहने आहेत. हिंडवडी व वाकड हद्दीत वाहन चालविण्यासाठी हिंजवडी व वाकड वाहतुक पोलिसांना दरमहा १३०० रुपये हप्ता द्यावा लागेल असे कानडे याने तक्रारदार यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे पाच महिन्यांचे एकूण सहा हजार पाचशे रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रादार यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यावर त्याने तडजोडीअंती दोन महिन्यांचे २ हजार ६०० रुपये कानडे याने मागितले. त्यानंतर लाचलुपचपतच्या पथकाने सापळा रचून हिंजवडी वाहतुक विभागाच्या कार्यालयासमोर भालचंद्र कानडे याला लाच स्विकारताना रंगेहात पकडले. अशा प्रकारे कोणी लाच मागिलतल्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या