हे काय चक्क… पोलीस ठाण्यातच जुगार अड्डा ; ५ पोलीस निलंबित

दारव्हा (यवतमाळ) :  पोलीसनामा ऑनलाईन – समाजात कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. सामान्य नागरिकांचे रखवालदार म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. पोलीस खात्यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचारी इमानदारीने आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र, काही कामचुकार आणि बेशिस्त पोलिसांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. अवैध धंद्यांना लगाम घालायचा सोडून पोलीसच जर जुगार खेळत असतील… ते देखील पोलीस ठाण्यात मग या पोलिसांना म्हणायचे तरी काय असा प्रश्न जनतेला पडला आहे.

जनतेचे रखवालदार असणारे पोलिसच पोलीस ठाण्यात बसून जुगार खेळतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल वरिष्ठांनी घेऊन पोलीस ठाण्यात जुगार खेळणाऱ्या पाच पोलिसांना निलंबीत करण्यात आले. हा प्रकार महिन्याभरापूर्वी उघडकीस आला होता. वरिष्ठांना याची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे यवतामाळ पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

बंदोबस्तासाठी तैनात जलद कृती दलाचे जवान येथील पोलीस ठाण्यातच ठाण मांडून जुगार खेळत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिले होते. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर पाच पोलिसांनी निलंबित करण्यात आले.

गोजोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

 

वढोली : गोंडपिपरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. भीमराव लालसू गावडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोठी ता. भामरागड येथील रहिवासी आहे. जोली येथे श्रीराम आदिवासी प्राथमिक तथा माध्यमिक विद्यालय असून विविध तालुक्यातील ३६० विद्यार्थी येथे शिकतात. सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करण्याकरिता येथील शिक्षक हे गोंडपिपरीपासून १५० कि. मी. अंतरावर असलेले आदिवासीबहुल तालुके भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी येथून विद्यार्थी आणतात. १ ते १० वर्ग असलेल्या या आश्रमशाळेतील भामरागड तालुक्यातील कोठी येथील आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मंगळवारी शाळेतच आकस्मिक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतक भीमराव गावडे हा दुसऱ्या वर्गात शिकत असून तो हुशार विद्यार्थी होता.
जाहिरात