जीवघेणा हल्ला होऊनही अखेर ‘त्या’ आरोपीस सहायक फौजदाराने (ASI) पकडले 

बार्शी : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या गुन्ह्यात हव्या असलेल्या संशयित आरोपीला वैराग पोलीस ठाण्यात आणले असता, पोलीस ठाण्यातून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहाय्यक फौजदाराने जिवाची पर्वा न करता पाठलाग करून त्याला पकडले. ह्या झटापटीत पोलीस गंभीर जखमी झाला असून, आरोपीचा बेदम मारही खावा लागला आहे. यामध्ये धाडस दाखवून जखमी झालेल्या सहाय्यक फौजदारांचे गोपाळ घोळवे असे नाव आहे. ही घटना वैराग येथील तलाठी कार्यालयासमोर घडली.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८७/२०१८ या गुन्ह्यातील संशयित आरोपी नितीन चंद्रकांत शिंदे व चंद्रकांत मधुकर शिंदे (रा. ढोराळे) हे वैरागमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती वैराग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस फौजदार गोपाळ घोळवे, पो.ना. रहीम सय्यद, पो.कॉ. चोरघडे, पो.कॉ. केंद्रे यांनी सापळा रचला. त्याप्रमाणे दोघेही अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ह्या दोन आरोपीसोबतचा सागर चंद्रकांत शिंदे पळून गेला. नितीन व चंद्रकांत यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची तपासणी केली.

यावेळी नितीन शिंदे याच्या ताब्यात सॅमसंग कंपनीचा जे ६ प्लस मोबाईल मिळून आला. मोबाईल संदर्भात चौकशी करत असताना दोन्ही आरोपी घोळवे यांना धक्का देऊन पळून गेले. घोळवे यांनी त्यांचा पाठलाग करून येथील तलाठी कार्यालयाजवळ पकडले. तेव्हा आरोपी नितीन शिंदे याने घोळवे यांना धक्का देऊन खाली पाडले. ह्या झटापटीत घोळवे यांच्या उजव्या पायात त्या ठिकाणी पडलेला काचेचा तुकडा घुसून मोठी जखम झाली. तसेच नितीन शिंदे याने घोळवे यांना तू कशी नोकरी करतो असे म्हणून बुक्क्यांनी मारहाण करत तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली..