ताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज़

विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. शिवाजीराव देशमुख हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या महिना भरापासून उपचार चालू होते.

आज अखेर त्यांच्या शरीराने उपचाराला साथ देणे सोडण्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सांगलीच्या ग्रामीण बाजाचे बोल घेऊन विधी मंडळात आलेले हे व्यक्तिमत्व सर्वच पक्षात आपला स्नेह आणि जिव्हाळा देऊन गेले आहे. त्यांनी १९९६ ते २००२ या कालावधीत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती पद भूषवले आहे. त्यांच्यावर उद्या त्यांच्या मूळ गावी कोकरुड जिल्हा सांगली या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवाजीराव देशमुखांचा अल्पपरिचय
– जन्म १ सप्टेंबर १९३५ सांगली जिल्ह्यात शिवजीराव देशमुख यांचा जन्म झाला.
– शिवाजीराव बापूसाहेब देशमुख असे त्यांचे संपूर्ण नाव होते.
– सांगली जिल्हा शिराळा तालुक्यातील  कोकरुड हे शिवाजीराव देशमुखांचे मुख्य गाव.
– १९७८ साली सर्वप्रथम ते विधानसभेवर निवडून गेले.
– त्यानंतर १९८०,१९८५ आणि १९९० असे सलग चार वेळा ते विधानसभेवर निवडून गेले.
-१९९६ ते २००२ या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्यरत होते.
– तसेच विधान परिषदेच्या सभापती पदी सलग तीन वेळा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम हि फक्त देशमुख यांच्याच नावावर आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या