दौंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे निधन

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन- (अब्बास शेख)दौंडचे माजी आमदार कृष्णराव उर्फ बाळासाहेब जगदाळे-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ८५ वर्षांचे होते. सतत हसतमुख आणि तालुक्याच्या विकासासाठी सतत कार्यशील  व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

बाळासो जगदाळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचे १ डिसेंबर रोजी दुपारी निधन झाले. बाळासाहेब जगदाळे यांनी सन १९८० ते ८५ या कालावधीत दौंडचे आमदार म्हणून  विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते.
बाळासाहेब जगदाळे यांच्या मागे पत्नी, २ मुले, ३ विवाहित कन्या, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

१९७२ ते ७८ आणि १९८५ ते १९९० असे दोन वेळा दौंडच्या आमदार म्हणून निवडून आलेल्या माजी आमदार उषादेवी जगदाळे या त्यांच्या पत्नी होत. जिल्हापरिषद सदस्य वीरधवल जगदाळे व दौंडचे नगरसेवक इंद्रजित जगदाळे हि त्यांची मुले आहेत.