नागपूरात वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ अल्पवयीन मुली बेपत्ता, परिसरात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर शहर हद्दीत घडलेल्या चार वेगवेगळ्या घटनांत चार अल्पवयीन मुली बेपत्ताप्रकरणी जरीपटका, धंतोली आणि अजनी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

पहिल्या घटनेत १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मावशीच्या घरी जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे गेली होती. तेथून पुन्हा घरी जाते, असे म्हणून निघाली ती घरी पोहोचली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता सापडली नाही. दुसऱ्या घटनेत धंतोली हद्दीत राहणाऱ्या फिर्यादीची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी कुणाला काहीही न सांगता निघून गेली. कुटुंबीयांनी शोध घेतला असता सापडली नाही. तिसऱ्या घटनेत अजनी हद्दीत कराहणाऱ्या फिर्यादीची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेली. कुटुंबीयांनी शोध घेतला असता सापडली नाही. चवथ्या घटनेत अजनी हद्दीत राहणाऱ्या फिर्यादीची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुणाला काहीही न सांगता निघून गेली. कुटुंबीयांनी शोध घेतला असता सापडली नाही.

या चारही घटनांत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

जीवघेणा हल्ला होऊनही अखेर ‘त्या’ आरोपीस सहायक फौजदाराने (ASI) पकडले