लग्न करताय ! मग आधी करा या चार गोष्टी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- लग्न हा मानवाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. तर हिंदू धर्मात हि लग्नाला महत्वाचा संस्कार मानले जाते. लग्नानंतर माणसाचे आयुष्यच बदलून जाते. बिनदास्त  जगणारा माणूस लग्नानंतर सांसारिक बनतो. पण लग्नाच्या अगोदर माणसांनी काही गोष्टी या आपल्या जोडीदाराशी बोलून नंतरच लग्नाला सामोरे जावे जेणेकरून माणसाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. आपल्या मनातील गोष्टी आपल्या जोडीदाराशी बोलल्यावर आपल्या जोडीदाराला आपल्या बद्दल विश्वास वाटू लागतो.
नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्या जोडीदाराशी बोलणे गरजेचे असते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. म्हणूनच आम्ही लग्नासारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करत आहे.

सेक्स लग्नाआधी कि लग्नानंतर 
सेक्स हा माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक असून सेक्स शिवाय मानवी प्रजातीचे भविष्य तयार होऊ शकत नाही. भारतीय समाजात लग्ना अगोदर सेक्स करणे अपवित्र मानले जाते परंतु मानवी समाजाची निकड म्हणून आणि आजची बदललेली जीवन पध्द्ती म्हणून काही लोक लग्ना अगोदरच सेक्स करण्याचा मार्ग अवलंबतात. यात गैर असे काहीच नसते परंतु हा प्रश्न ज्याचा त्यांनी विचार करून सोडवण्याचा प्रश्न आहे.परंतु आपण ज्या जोडीदाराशी लग्न करणार आहे त्यांच्याशी सेक्ससाठी एकमत झाल्यावरच आपण हे पाऊल उचलावे.

आपल्या लग्न होणाऱ्या जोडीदारा पासून काहीच लपवू नका   
आपले ज्या व्यक्ती सोबत लग्न होणार आहे. त्या जोडीदारा पासून आपण काहीच लपवू नका. कारण तुमच्या आयुष्याशी निगडित काही गोष्टी जर तुमच्या शिवाय दुसऱ्या व्यक्तीने जर सांगितल्या तर तुमच्या जोडीदाराच्या मनावर त्यांचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या भूतकाळाबद्दल खुल्या मनाने सांगण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना तुमच्या वैहवाहिक जीवनाला करावा लागणार नाही.

बाळाचे नियोजन 
“प्रत्येक स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा ती फक्त बाळाला जन्मच देत नाही तर ती स्वतः आई म्हणून जन्म घेत असते. म्हणून कोणालाही लग्न झाल्यास आई बाबा होण्यास आवडते. संसार करणे म्हणजे सोपी गोष्ट नसते असे आपण आजू बाजूला ऐकत असतो म्हणून तुमच्या आर्थिक अडचणीमुळे बाळाचा निर्णय तुम्हाला पुढे ढकलावा लागेल असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारा सोबत याविषयी खुल्या मनाने बोला जेणेकरून तुमच्यात या महत्वाच्या विषयावरून वाद निर्माण होणार नाहीत.

पारिवारिक कलह
लग्न हे अरेंज मॅरेज असेल तर त्या लग्नाच्या अगोदर तुम्ही मानपानाच्या गोष्टी बोलून घेणे महत्वाचे ठरते कारण भविष्यात लग्न मोडण्याच्या किंवा हेव्या दिव्याच्या मुद्द्यांना खतपानी मिळू शकते. लग्न जर लव्ह मॅरेज असेल आणि तुम्ही दोघांच्या घरच्या माणसांना तुमच्या लग्नासाठी अरेंज करत असाल तर दोन्ही घरच्या मंडळींची मने जुळवण्याची मोठी कसोटी तुम्हाला करावी लागते. त्यासाठी तुम्ही ठरवून कृती करा जेणेकरून तुमचे पारिवारिक कलह उद्भवणार नाहीत.