मोबाईलच्या बहाण्याने 4 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

मोबाईलवर गेम खेळण्यासाठी मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका 4 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्‍कादायक घटना लोणी काळभोर येथे रविवारी (दि.23) रात्री उशिरा उघडकीस आली आहे. अत्याचार केल्यानंतर युवक फरार झाला आहे. पिडीत मुलाच्या कुटूंबियाने युवकाच्या भावाला ताब्यात घेवुन लोणी काळभोर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5f0a120f-bff8-11e8-ad95-6f89627ae631′]

अमरिश उर्फ साजन दास याने अल्पवयीन मुलावर अत्याचार केले आहेत. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच तो फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील कदमवाक वस्तीच्या हद्दीत एका बिल्डींगमध्ये पिडीत मुलगा आणि त्याचे कुटूंबिय रहावयास आहेत. त्याच बिल्डींगमध्ये आरोपी अमरिश व त्याचा भाऊ भाड्याच्या रूममध्ये वास्तव्य करत  होते. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलाला अमरिशने मोबाईलवर गेम खेळण्यासाठी मोबाईल देतो असे आमिष दाखविले. पिडीत मुलाला आपल्या खोलीत नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळानंतर पिडीत मुलगा दुसर्‍या मजल्यावरून खाली आला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती त्याच्या आईला दिली. पिडीत मुलाच्या आईने अमरिशला त्याच्या घरात जावुन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, संधीचा फायदा घेत आरोपी अमरिशने तेथुन पळ काढला. पिडीत मुलाला खुप त्रास होत असल्याने त्याला खासगी रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना समजली. रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस अमरिशचा शोध घेत आहेत.

नौदलाने वाचवले नौदलाचे प्राण… दोन दिवस देत होते मृत्यूशी झुंज