काची प्रतिष्ठानतर्फे मोफत रुग्णवाहिकेची सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येथील काची प्रतिष्ठानतर्फे नुकतीच मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. पुण्याच्या मध्यवर्ती म्हणजे फूलवाला चौक येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा वटाणा हमी भावात खरेदी करून तो वटाणा या परिसरात मोफत वाटण्यात आला.

या कार्यक्रमाला विजयकांत कोठारी, विजय भटेवरा, कमलताई व्यवहारे, अभय थोरात, संजय बालगुडे, सुधीर काळे, वीरेंद्र किराड, सतीश उसळ, विलास भुजबळ, महेश शिर्के, लक्ष्मण जगदाळे, करण जाधव, सुधीर मनसुख, संतोष राठोड, राजू भोले, सागर केकाण, डॉ. श्रीराम आठवले, गोपी पवार, जवाहर किराड, दादा मल्लाव, मनिष मल्लाव, राजेंद्र तावरे, मनोज ओस्तवाल, तानाजी डिंबळे, रवी शहाणे, दादा ताम्हाणे, गंगाराम सरपाले, रशीद बाबा, जया किराड, भारत काची, अमोल आंदेकर, बिपीन काची, नितीन काची, अंकुश काची, संजय काची, किशोर परदेशी, चंद्रकांत काची, सतिश काची, राजूसिंग छपरबंद, आदि उपस्थित होते.