अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी सुवर्ण संधी ; निशुक्ल तंत्र उद्योगाचे मिळणार प्रशिक्षण

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – बेरोजगाराची भीषणता देशभर जाणवत असताना तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण करण्याचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत करण्याचे आयोजिले आले आहे. सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी(ST) असून या प्रशिक्षणाचा कालावधी सहा आठवड्यांचा आहे. मोटार मेकॅनिकचे सर्व प्रशिक्षण या प्रशिक्षण वर्गात देण्यात येणार असून हे प्रशिक्षण निवासी आणि मोफत असणार आहे. तसेच हा प्रशिक्षण कार्यक्रम ५ आठवडे चालणार आहे.

आवश्यक कागदपत्र
मार्कशीट,शाळा सोडलेला दाखला,२ फोटो आणि जातीचे प्रमाणपत्र

नियम आणि अटी
प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणारा व्यक्ती हा किमान आठवी पास असणे आवश्यक आहे.
तो व्यक्ती फक्त अनुसूचित जातीचाच (ST) असणे आवश्यक आहे.
त्या व्यक्तीचे वय १८ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे
त्याच प्रमाणे प्रशिक्षणासाठी व्यक्तीची निवड हि मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
या मुलाखती ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजल्या पासून खाली नमूद ठिकाणी घेण्यात येणार आहेत.

प्रशिक्षणात या बाबींचा असणार समावेश
उद्योजकतेसाठी असणाऱ्या गुणांचा व्यक्तीमध्ये विकास करणे आणि प्रत्यक्ष उदयोग जगताला भेट देणे
शासकीय निमशासकीय संस्थांच्या उद्योग जगताला असणाऱ्या विविध कर्ज योजनांची माहिती देणे
प्रकल्प अहवाल तयार करण्याचे प्रशिक्षण देणे
उत्पादनाच्या बाबत प्रशिक्षित करणे
मनुष्यबळ व्यवस्थापन, पणन व्यवस्थापन,उद्योग उभारणीस येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निराकरण याबाबत प्रशिक्षण देण्यात आली आहे. याच प्रमाणे मॅकेनिकलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संपर्क कोठे करावा
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्या मुख्यकार्यालयाशी संपर्क साधने इच्छुकांनी आवश्यक आहे. त्याचा पत्ता असा आहे, एमसीएडी -पहिला मजला ,संघवी केशरी महाविद्यालय मोहन नगर एमआयडीसी पिंपरी चिंचवड पुणे. या ठिकाणी इच्छुकांनी वरील कागद्पत्रासहित दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता उपस्थित राहायचे आहे. या कार्यक्रम निवासी असल्यामुळे निवासाची ,चहा नाष्ट्याची तसेच दोन वेळेच्या जेवणाची मोफत व्यवस्था संस्थेच्या वतीने केली जाणारा आहे.

अधिक माहिती साठी या भ्रमणध्वनी नंबरवर संपर्क साधावा
कार्यक्रम समन्वयक – दत्तात्रय व्यवहारे,७८८७६२९०८८
प्रकल्प अधिकारी – श्रीकांत कुलकर्णी,९४०३०७८७६०