कचरा विलगीकरण व खतनिर्मितीसाठी नि:शुल्क मार्गदर्शन व प्रात्यक्षिक उपलब्ध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ (Solid Waste Management) मधील तरतूदीनुसार नागरिक व व्यावसायिक यांनी घर, परिसर, व्यवसाय इ. ठिकाणी उत्पन्न होणारा कचरा ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. शहरातील सर्व वैयक्तीक कुटूंबे, गृहनिर्माण संस्था, निवासी सुकुले, बाजार संकुले, हॉटेल व उपहारगृहे, दुकाने, कार्यालये यामध्ये निर्माण होणा-या घनकच-याचे विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच जे घर, परिसर, व्यवसाय इ. ठिकाणी दर दिवशी १०० किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो किंवा जे घर, परिसर, व्यवसाय इ. जागेचे क्षेत्रफळ ५००० चौ.स्क्वे.मी. व त्यापेक्षा जास्त आहे असे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण (Bulk Waste Generator) होतो. या कार्यक्षेत्रातील मोठया प्रमाणात उत्पन्न होणा-या ओल्या कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे आवश्यक असुन उरलेला सुका कचरा महानगरपालिकेस दयावा असे कळविलेले आहे. अन्यथा महानगरपालिकेकडुन दंड/शुल्क आकारण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f31f36c-b82c-11e8-a62f-c3677050ad0f’]
ई क्षेत्रीय कार्यालयाचे सहा. आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे यांचे मार्गदर्शनाखाली सुमनशिल्प या सोसायटीमध्ये कचरा विलगीकरण व कच-यापासुन खतनिर्मिती प्रत्यक्षरित्या साकार केलेली आहे. तरी सर्व नागरिक, व्यापारी, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, बचतगट यांना कचरा विलगीकरण व कच-यापासुन खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन हवे असल्यास अवश्य संपर्क साधा सहा. आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे (९९२२५०१८८५) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रेमात नापास झालेल्या युवतीने SSC बोर्डाच्या कार्य़ालयात जाळून घेतले