क्राईम स्टोरी

गँगवॉर : गुन्हेगारानेच केला भररस्त्यात गुन्हेगाराचा खात्मा

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – कालरात्री नागपूर शहरात पुन्हा एकदा गॅंगवॉर झाला. या गॅंगवारमध्ये एका गुन्हेगारानेच दुसऱ्या गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना घडली आहे. गौरव (पंड्या पिल्लेवान) या गुन्हेगाराची नागपूर येथील कमाल चौकात भररस्त्यावर इतर काही गुन्हेगारांच्या टोळीने धारदार शास्त्राने भोसकून हत्या केली.
कोण होता गौरव पिल्लेवान ?

गौरव पिल्ल्लेवान हा मोठा गुन्हेगार असून त्याने या आधी २०१६ रोजी याच कमाल चौकात एका तरुणाची हत्या केली होती. या प्रकरणी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात अली होती. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता.ज्या तरुणाची त्याने हत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांच्या मागणीमुळे त्याला परिसरात वावर करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

असा केला गेला गौरवचा खात्मा

गौरवचा या परिसरात तरी देखील राजरोसपणे वावर सुरूच होता. याचाच फायदा अन्य टोळीने घेतला.आणि काल रात्री गौरव शनीचरा बाजार परिसरात उभा असताना त्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी अचानक धारदार शास्त्राने वार केले. धारदार शास्त्राने वार केल्याने या हल्ल्यात गौरवचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौरव पिल्लेवानच्या हत्या प्रकरणी योगेश धनविजय या आरोपीला अटक केली असून.

पोलीस त्याच्या टोळीतील इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून नागपूर शहरात सतत भररस्त्यावर होणाऱ्या हत्येच्या घटनेमुळे राज्याचे गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या