कोथरुड येथील कचरा डेपोला आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोथरुड येथील कचरा डेपोला आग लागली असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज निर्माण झाले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a76bae1-cefa-11e8-8d03-9f6ad05fa407′]

आज (शुक्रवार) दुपारी कोथरुड येथील कचरा डेपोतून धुर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी धुर निघत असून आग नसल्याचे सांगितले होते. मात्र, आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

[amazon_link asins=’B01MTBZOOB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78d152a5-cefa-11e8-98b9-331320e62510′]

पालिकेच्या वन विभागाकडून रस्त्याच्याकडेला असेल्या झुडपे तोडली होती. या झुडपांना आग लागून कचऱ्यातून धूर येत होता. आज सकाळी या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवांनी जाऊन पाणी मारले होते. त्यामुळे धुर येत असावा असे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले होते. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कोथरुड परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेले नाही. या ठिकाणी सध्या दोन गाड्यांमधून पाणी मारण्याचे काम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नांदेड सिटीतील मसाज स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश