उंड्रीत गॅसच्या दुकानात गॅसचा स्फोट ; दोघे भाजले

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – उंड्रीतील अतुल नगरमध्ये एका गॅसच्या दुकानात गॅस भरत असताना गॅसचा स्फोट झाल्याची घटना रात्री एक ते दीडच्या सुमारास घडली. या घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत. स्फोट इतका मोठा होता की, दुकानाचे शटरच उखळून पडले तर दुकानातील काचाही फुटल्या.

अतुलनगर येथे रुक्माई गॅस नावाचे गॅस अप्लायन्सेसचे खासगी दुकान आहे. या दुकानात काही लहान गॅसच्या टाक्या भरल्या जातात. रात्री एकच्या सुमारास दुकानाचे शटर बंद करून कामगार गॅस भरत होते. त्यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या सोसायटीतील लोक जागे झाले. तर दोन कामगार भाजले. स्फोट एवढा मोठा होता की, दुकानाचे शटरच उखळून पडले. तर दुकानातील काचाही फुटल्या. त्यानंतर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. कोंढवा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केल्यावर सुदैवाने तेथे आग लागली नसल्याचे निदर्शनास आले. दुकानात एक कमर्शियल  व ८ घरगुती गॅस, तर २५ छोटे सिलेंडर ठेवलेले होते. सुदैवाने आग न लागल्याने कोणतीही मोठी घटना घडली नाही. मात्र आवाजाने परिसरात एकच घबराट उडाली होती.

पोलीसाचा खून करणाऱ्याकडून उपनिरीक्षकाला (PSI) जिवे मारण्याची धमकी