पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
तौसिफ यासीन शेख (२१, सय्यद नगर हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीतील वाझत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांनी हडपसर परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत पिस्तूलासह येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानुर, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, व कर्मचाऱ्यांनी केली.