प्रेम करतेस…? मरण्याची हिम्मत आहे…? प्रियकराच्या प्रश्नावर तिची आत्महत्या

बंगळुरु वृत्तसंस्था – मरण्याची हिम्मत आहे का ? या प्रियकराच्या एका प्रश्नावर प्रेयसीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जियेंगे साथ मरेंगे साथ अशा शपथा घेत तरुण तरुणी प्रेमात पडतात. या ना त्या कारणाने त्यांच्यात भांडणेही होतात. अनेकदा तरुण तरूणी पळून जातात आणि तरुणीची फसवणूक होते अशाही अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. असे प्रेमाच्या आणा भाका घेत प्रेमसंबंधात असणाऱ्या तरुणीने आत्महत्या केली आहे. मरण्यासाठी हिम्मत लागते. ती तुझ्यामध्ये आहे ? असा मेसेज प्रियकराने पाठवल्यानंतर प्रेयसीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. दिव्या या तरुणीचं नाव आहे. पूर्व बंगळुरुतील किथागानूरमध्ये ही घटना घडली आहे. दिव्याचे वय २० वर्षे आहे. या घटनेनंतर दीव्याचा प्रियकर हरीश फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हरीश सुद्धा त्याच वस्तीत रहातो. मंगळवारी रात्री ही घटना घडली.

त्याने लग्नासाठी मागितले  १५ लाख रुपये
दिव्या आणि हरीशच्या प्रेमसंबंधांला कुटुंबियांचा विरोध असल्याने चार महिन्यांपूर्वी ते घरातून पळून गेले होते. दिव्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर दोघेही पुन्हा आपआपल्या घरी परतले. दिव्याला हरीश बरोबर लग्न करायचे होते. आम्ही सुद्धा या लग्नासाठी तयार झालो होतो. पण हरीशने लग्न करण्यासाठी १५ लाख रुपये मागितले तिथून समस्या सुरु झाली असे दिव्याची आई अनुराधाने सांगितले. पैसे मिळाले नाहीत तर दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन अशी हरीश धमकी देत होता असा आरोप अनुराधान यांनी केला आहे.
…आणि तिने केली आत्महत्या 
दिव्याने जेव्हा हरीशला लग्न करण्यासाठी मेसेज पाठवला. तेव्हा त्याने आपण दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करणार आहोत असे उत्तर दिले. तू मेलीस तरी मला फरक पडणार नाही असे हरीशने तिला सांगितले. एवढ्यावरच हरिश थांबला नाही तर त्यानंतर त्याने मरण्यासाठी हिम्मत लागते. ती तुझ्यामध्ये आहे ? असा मेसेज पाठवला. आधीच प्रेमात अपयश आल्याने निराश झालेल्या दिव्याने तो मेसेज वाचला व विष पिऊन आत्महत्या केली.